Pune:संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज जयसिंग महाराज मोरे (Jaisingh Maharaj More)यांचे काल सकाळी ९ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांनी आयुष्यभर वारकरी समुदायाची सेवा करण्यासाठी आणि संत तुकाराम व संत ज्ञानेश्वरांच्या शिकवणींचा प्रचार करण्यासाठी स्वतःला समर्पित केले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचे बंधू जालिंदर महाराज मोरे हे संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष आहेत. बुधवारी निधन होण्यापूर्वी जयसिंग महाराजांवर अनेक दिवस उपचार सुरू होते. संत तुकाराम महाराजांशी संबंधित कामांसह वारकरी संप्रदायाबद्दल प्रकाशित होणाऱ्या वादग्रस्त साहित्याला त्यांचा तीव्र विरोध होता तसेच त्यांनी या मुद्द्यांवर कायदेशीर लढाईत सक्रिय सहभाग घेतला.संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांशी संबंधित विविध समस्या सोडवण्यात त्यांचा पुढाकार होता. जयसिंग महाराज शेडगे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात दिंडी क्रमांक तीनचे प्रमुख होते.
पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर, विविध संस्थांचे अधिकारी आणि इतरही विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.शिवाय राज्याच्या कानाकोपऱ्यातून जयसिंग महाराजांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे,