रेशन कार्डधारकांसाठी (Ration Card) मोठी बातमी आहे. ३१ एप्रिल २०२५ पर्यंत हे काम केले नाही तर मोफत मिळणारे धान्य बंद होऊ शकते. होय, राज्य सरकराने ३१ एप्रिल २०२५ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्यास सांगितले आहे. अन्यथा अनुदानित राशन बंद केले जाईल असे सांगण्यात आले आहे.
यापूर्वी रेशन कार्डधारकांसाठी केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ होती. मात्र, आता ही मुदत आणखी वाढवण्यात आली असून, नागरिक आता ३१ एप्रिल २०२५ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करु शकतात.
दरम्यान, राज्य सरकराने केवायसी करण्याची ही अंतिम संधी तारीख असल्याचे देखील स्पष्ट केले आहे. अशातच जर तुमचेही केवायसीचे काम अजूनही झाले नसेल तर ताबडतोब ते पूर्ण करून घ्या अन्यथा तुम्हाला मोफत मिळणारे राशन बंद होऊ शकते.
मागील काही महिन्यांपासून राज्यभरात रेशन कार्डधारकांसाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. यासाठी यापूर्वी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदतवाढीची चौथी वेळ असून, यानंतर कोणतीही अतिरिक्त मुदत मिळण्याची शक्यता नाही.
या अंतिम मुदतीनंतर ज्या कार्डधारकांची केवायसी प्रक्रिया अपूर्ण असेल, त्यांना मिळणारे मोफत किंवा अनुदानित धान्य बंद केले जाईल, तसेच त्यांचे रेशन कार्ड रद्द होण्याचीही शक्यता आहे.
रेशन कार्ड केवायसी पूर्ण करण्यासाठी सरकारने ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. नागरिक आपल्या सोयीनुसार कोणत्याही पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.