केरळमधील (Kerala) श्री नारायण धर्म परिपालन या पक्षाचे सरचिटणीस वल्लापल्ली नटेसन यांच्या एका वक्तव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. वल्लापल्ली नटेसन यांनी मुस्लिम बहुसंख्य मलप्पुरम हा एक पूर्णपणे वेगळा देश असल्याचे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
नेटसन यांनी अधिवेशनात बोलताना हे वक्तव्य केलं आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘मला वाटत नाही की तुम्ही मल्लपुरममध्ये ताज्या हावमानाचा उपभोग घ्याल. तसेच मोकळा श्वासही घ्याल. मला वाटत नाही की इथे तुम्ही स्वातंत्रपणे आपले मत तयार करून आपले जीवन जगू शकाल. मलप्पुरा हा एक वेगळा देश आहे. ते वेगवेगळ्या लोकांचे राज्य आहे.’
नेटसन यांनी वक्तव्य केलेल्या मलप्पुरममध्ये सुमारे ७० टक्के मुस्लिम तर २७ टक्के हिंदू लोकसंख्या आहे. याठिकाणी मुस्लिम लोकांची संख्या जास्त आहे. अशातच नेटसन यांच्या वक्तव्यावर अनेक राजकीय नेते प्रतिक्रिया देत असून, इंडियन यूनियन मुस्लिम लीगकडूनही यावर तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
दुसरीकडे नटेसन यांनी आपल्या विधानाचे समर्थन केले आहे. व विरोधकांनी त्यांच्या विधानाचे चुकीचे वर्णन केले असल्याचे म्हंटले आहे. आपल्या वक्तव्याच्या बचावात नटेसन म्हणाले की, ‘मी येथील सामाजिक आणि आर्थिक असमानता यावर विधान केलं आहे. विरोधकांनी माझे वक्तव्य तोडून मोडून सादर केल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
सध्या या विधानाचा तीव्र निषेध केला जात असून, मुस्लिम समुदायाविरुद्ध केलेले हे विधान अपमानजनक असल्याचे म्हटले आहे. या वक्तव्यामुळे केवळ मलप्पुरमच्या लोकांचा अपमान झाला नाही तर केरळच्या जातीय मैत्रीपूर्ण संबंधालाही धक्का पोहोचला आहे. असं इंडियन यूनियन मुस्लिम लीगच्या नेत्यांकडून बोललं जात आहे. इतर राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनीही त्यांच्या या वक्तव्याला बेजबाबदार म्हणत आहेत.