१८ मार्च रोजी इस्राईली आणि हमास यांच्यात झालेला युद्धबंदी करार संपल्यानंतर दोन्ही कडून हवाई हल्ले सुरूच आहेत. वाढत्या हल्ल्यांमुळे गाझात सध्या बिकट स्थित निर्माण झाली आहे. या हल्ल्यांमध्ये गाझातील निष्पाप नागरिकांचा बळी जात आहेत. हमास आणि इस्राईमध्ये गाझापट्टीवर सुरु असलेल्या संघर्षादरम्यान तसेच इस्राईवर लादलेल्या टॅरिफ शुल्कानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात महत्वपूर्ण बैठक झाली आहे.
ट्रम्प यांनी नेतन्याहू यांना भेटीचे निमंत्रण पाठवले होते. ट्रम्प यांचे निमंत्रण स्वीकारून नेतन्याहू अमेरिकेला गेले होते. दोन्ही नेत्यांची भेट अमेरिकेची राजधानी वॉशिंगटन येथे झाली. नेतन्याहू यांनी ट्रम्प यांना भेटून टॅरिफबाबत तसेच गाझा संघर्षाबाबत चर्चा केली.
बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्रम्प यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीबद्दल पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ‘ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केल्याबद्दल मी ट्रम्प यांचा आभारी आहे. पुढे ट्रम्प यांचे कौतुक करत खरे मित्र म्हणून ट्रम्प यांचा उल्लेख केला आहे.
यावेळी गाझामध्ये असलेल्या इस्राईली ओलिसांबाबत, तसेच तेथील संघर्षाबाबत आणि इस्रायलवर लादलेल्या ट्ररिफबाबत आपली ट्रम्प यांच्याशी चर्चा झाल्याचे नेत्यानाहू यांनी सांगितले. बदलत्या जागतिक वातावरणात अमेरिका आणि इस्राईलमधील संबंध महत्त्वाचे असल्याचे नेत्यानाहू म्हणाले. या भेटीत व्यापार आणि इतर जागतिक विषयांवरही चर्चा झाली आहे. सध्या मध्य पूर्वेत अनेक गोष्टींमुळे अशांतता निर्माण झाली आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज दोन्ही देशांनी व्यक्त केली आहे.
गाझापट्टीवर सुरु असलेल्या संघर्षावर पंतप्रधान बेंजामन नेतान्याहू यांनी सांगितले की, गाझामध्ये हमासने ताब्यात घेतलेल्या अधिक ओलिसांच्या सुटकेसाठी एक नवीन करारावर चर्चा सुरू आहे. आम्ही आणखी एका करारावर काम करत आहोत, जो यशस्वी होईल अशी आम्हाला आशा आहे आणि आम्ही सर्व ओलिसांना सोडण्यासाठी वचनबद्ध आहोत. अमेरिका देखील यात मदत करेन. असं नेतान्याहू यांनी पत्रकारांना सांगितले आहे.
#WATCH | Washington, DC | During a bilateral meeting with Prime Minister of Israel Benjamin Netanyahu, US President Donald Trump says, "The EU has been very tough over the years. It was formed to do damage to the United States in trade. It was formed with all of the countries… pic.twitter.com/00w5e2DRgO
— ANI (@ANI) April 7, 2025
दरम्यान, इस्राईलवर 17 टक्के टॅरिफ लादल्यानंतर नेत्यानाहू यांच्या या भेटीकडे जगाचे लक्ष होते. जगाला हादरवून टाकणाऱ्या अमेरिकेच्या ट्ररिफपासून दिलासा देण्याची विनंती करणारे ते पहिलेच नेते आहेत. अशातच आता अमेरिका काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.