Purandar Airport: पुरंदर विमानतळ प्रकल्पाला विरोध करण्यासाठी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सात गावातील नागरिकांनी शुक्रवार म्हणजेच ४ एप्रिल पासून सासवड मधील प्रशासकीय इमारतीसमोर बेमुदत उपोषण सुरु केले होते. मात्र आज या आंदोनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले आहे.
या आंदोलनकर्त्यांनी समजूत प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांनी रविवारी काढली होती. तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा ड्रोन सर्व्हे अथवा कोणतीही मोहीम राबविणार नाही, वर्षा लांडगे यांनी असे स्पष्ट केले होते. त्यानंतर तीन दिवस सुरु असलेले उपोषण गावकऱ्यांनी सोडण्यात आले. मात्र त्याचवेळी प्रकल्पाला आपला विरोध कायम ठेवणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान,पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, पारगाव, खानवडी आदी सात गावात विमानतळ प्रकल्पाची घोषणा करण्यात आली असून यासाठी २८३२ हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. विमानतळ प्रकल्प क्षेत्रातील गावे औद्योगिक क्षेत्र म्हणून शासनाने जाहीर केली आहे.
मात्र विमानतळ प्रकल्प करायचा आहे त्यांनी स्वतःच्या जागेत करावा नाही तर आम्हाला तुमची जागा द्या आणि नंतर विमानतळ करा तोपर्यंत आमच्या जमिनीत कोणालाही पाय ठेवून देणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.