Amit Shah: 12 एप्रिल रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 345 वी पुण्यतिथी आहे. शिवरायांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हजेरी लावणार आहेत. अर्थातच १२ एप्रिल रोजी अमित शहा रायगड दौऱ्यावर आहेत.
कसा असेल अमित शहांचा रायगड दौरा:
-12 एप्रिल 2025 रोजी, अमित शहा सकाळी 10 वाजता पुणे विमानतळावर आगमन करतील. त्यानंतर सकाळी 10:45 वाजता ते पाचाड येथे हेलिकॉप्टर लँड करतील.
-त्यानंतर, सकाळी 11 ते दुपारी 1 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे रायगडावर मुख्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान, शहा महाराजांच्या समाधीस्थळावर पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहणार आहेत. -कार्यक्रमानंतर, दुपारी 1:30 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पाचाडवरून टेक ऑफ करून दुपारी 2 वाजता सुतारवाडी येथील खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भोजन करण्यास येतील.
-त्यानंतर, दुपारी 3 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईकडे येण्यास रवाना होतील. त्यानंतर, सायंकाळी 4 ते 6 वाजता ते विलेपार्ले येथील चित्रलेखा साप्ताहिकाच्या कार्यक्रमात सहभागी होतील.
-त्यानंतर रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सह्याद्री अतिथीगृहात मुक्काम करतील. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 एप्रिल 2025 रोजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दिल्लीकडे रवाना होतील.
दरम्यान यापूर्वी २०२२ मध्ये केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी रायगडावर आयोजित कार्यक्रमात हजेरी लावली होती. तसेच इतरही केंद्रीय नेत्यांनी आजवर रायगडाला भेट दिली आहे.