Udhav Thackeray: विधानसेभत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्यानंतर अनेकांनी उद्धव ठाकरेंची(Udhav Thackeray)साथ सोडत शिवसेनेत(Shivsena) प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरे चिंतेत आहेत. त्यातच त्यांना मुबंईतून आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कारण ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका संजना घाडी आणि त्यांचे पती माजी नगरसेवक संजय घाडी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आज म्हणजेच १३ एप्रिल रोजी संजना घाडी आणि संजय घाडी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. संजय घाडी आणि संजना घाडी हे दोघेही शिवसेना ठाकरे गटाचे बोरिवली-मागाठणे परिसरातील चेहरे होते. आता, पती-पत्नींनी शिवसेना ठाकरे गटाचे शिवबंधन सोडत थेट एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
संजना घाडी या ठाकरे गटाच्या एक महत्त्वाच्या नेत्या मानल्या जातात. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाकडून प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र या यादीत संजना घाडी यांचे नाव नव्हते. विशेष म्हणजे त्या शिवसेनेच्या उपनेत्या असूनही त्यांचे नाव नव्हते. त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर अगदी शेवटच्या क्षणी संजना घाडी यांचे नाव प्रवक्तेपदी जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे देखील संजना घाडी नाराज होत्या, अशा चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान, ठाकरे गटातील नेत्यांचा शिवसेनेत होत असलेला प्रवेश हा ठाकरे पक्षबांधणीमध्ये फेल ठरले याचे उदाहरण म्हणता येईल. कारण अनेक नेत्यांनी आपआपल्या भागात पक्षाच्या बैठकींच्या अभावामुळे पक्ष सोडत असल्याचे सांगितले. लोकसभेत झालेल्या विजयात आणि सहानुभूतीचे राजकारण करण्यात ठाकरे इतके हरवून गेले की त्यांना आहे या नेत्यांना देखील जोडून ठेवता आले नाही, असे आपल्याला म्हणता येईल.