भारतीय संघाचा युवा आणि सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा सध्या चर्चेत आहे. अभिषेकने पंजाब किंग्जच्या गोलंदाजांना अक्षरशः पाणी पाजले आहे. अभिषेक शर्माने ५५ चेंडूत १४१ धावांची चमकदार कामगिरी केली आहे. त्याने केलेली ही कामगिरी आयपीएलच्या इतिहासातील तिसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
अभिषेकने आपले शतक फक्त ४० चेंडूत पूर्ण केले आहे. जे आयपीएलच्या इतिहासात भारतीय फलंदाजाने केलेले तिसरे सर्वात जलद शतक होते. त्याने त्याच्या डावात २५६.३६ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि १४ चौकार आणि १० षटकार मारले. यादरम्यान, अभिषेकने या हंगामातील आतापर्यंतचा सर्वात मोठा षटकारही मारला आहे. जो आयपीएल २०२५ मधील आतापर्यंतचा सर्वात लांब षटकार होता.
UNSTOPABBLE ABHISHEK! 💥
He smashed the longest six of #TATAIPL 2025 & what better stage than this to do that 💪
Watch the LIVE action ➡ https://t.co/HQTYFKNoGR
#IPLonJioStar 👉 #SRHvPBKS | LIVE NOW on Star Sports Network & JioHotstar! pic.twitter.com/uvLw5Drj4Q— Star Sports (@StarSportsIndia) April 12, 2025
सनरायझर्स हैदराबादच्या या खेळाडूने पंजाब किंगविरुद्ध फलंदाजी करताना सर्वात लांब षटकार मारला आहे. पंजाब किंग्सचा बॉलर मार्को यानसन जेव्हा अभिषेकला बॉल टाकत होता तेव्हा अभिषेक शर्माने मिड-विकेटवर त्याच्या बॉलवर एक जबरदस्त षटकार मारला. हा षटकार 106 मीटर लांब होता. आत्तापर्यंत आयपीएल २०२५ मध्ये कोणत्याही खेळाडूने एवढा लांब षटकार मारलेला नाही. या हंगामात आरसीबीचा खेळाडू फिल साल्ट याने गुजरात टायटन्सविरुद्ध 105 मीटर लांब षटकार मारला आहे.
शनिवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हैद्राबाद आणि पंजाबमध्ये झालेल्या सामन्यात अनेक रेकॉर्ड्स झाले आहेत. ज्यामुळे सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यातील हा सामना इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. खरंतर, पंजाब किंग्जने सनरायझर्स हैदराबादला २४६ धावांचे मोठे लक्ष्य दिले होते. अनेक संघ ५० षटकांत हे लक्ष्य गाठू शकत नाहीत. पण हैदराबादने या धावांचा पाठलाग पूर्ण करण्यासाठी २० षटकेही घेतली नाहीत आणि केवळ १८.३ षटकांत ८ गडी गमावून सामना जिंकला. २४ वर्षीय अभिषेक शर्माने हैदराबादच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.