काँग्रेस पक्ष आपल्या नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांना मोठं पद देण्याचा विचार करत आहे. सध्या त्या पक्षाच्या सरचिटणीस आहेत, पण त्यांच्याकडे कोणतीही थेट जबाबदारी नाही. मात्र, असे असतानाही त्या पक्षामध्ये शांतपणे काम करत आहेत. पक्षाला आलेली मरगळ पाहता प्रियंका गांधी यांनी एक पायलट प्रोजेक्ट तयार केला आहे, ज्यामध्ये जिल्ह्याच्या काँग्रेस अध्यक्षांना (जिल्हाध्यक्षांना) अधिक अधिकार दिले जातील. ज्याचा उद्देश जिल्हास्तरीय नेत्यांना अधिक जबाबदारी आणि अधिकार देऊन काँग्रेसची तळागाळातील रचना मजबूत करणे आहे,
हे काम पहिल्यांदा गुजरातमध्ये सुरू होणार आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला, तर संपूर्ण देशभर लागू केला जाईल.काँग्रेसमधील काही लोकांचे म्हणणे आहे की प्रियंका गांधी यांना पक्षाच्या उपाध्यक्षपदावर नेमण्याची चर्चा सुरू आहे. यावर अंतिम निर्णय झाला नाही, पण पक्षामध्ये हालचाल सुरू आहे. काँग्रेस आता संघटना मजबूत करण्यासाठी अधिक काम करणार आहे. पक्षात काही बदल होणार असून, यामुळे कामकाज अधिक चांगलं होईल अशी अपेक्षा आहे.
प्रियंका गांधी अधिवेशनाला गैरहजर – भाजपकडून टीका
गुजरातमध्ये नुकतंच काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन झालं. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे तिथे उपस्थित होते. पण प्रियंका गांधी आल्या नव्हत्या. यावर भाजपने टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की प्रियंका गांधींची अनुपस्थिती ही गांधी कुटुंबातील अंतर्गत समस्या दाखवत आहे. ही पहिली वेळ नाही. याआधीही एका मोठ्या कार्यक्रमात त्या दिसल्या नव्हत्या. त्यामुळे खरच काँग्रेसमध्ये सर्व काही ठिक आहे का, असा सवाल विरोधक उपस्थित करत आहेत.
भाजपसारखा एक तगडा पक्ष समोर असताना कॉंग्रेसला विविध राज्यातील निवडणुकांमध्ये सातत्याने फटका बसत आला आहे.महाराष्ट्रात देखील गेल्यावर्षी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांना भाजपच्या उमेदवारांकडून पराभूत्त व्हावे लागले होते. अशा परीस्थितीत प्रियांका गांधी यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड होते का? आणी जर निवड झालीच तर त्या पक्षाला आलेली मरगळ दूर करतात का? ते पहाणे महत्वाचे ठरणार आहे.