सध्या आयपीएल २०२५ मुळे क्रिकेटप्रेमींचा उत्साह वाढला आहे. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये गेल्या हंगामातील यशस्वी संघ मागे पडताना दिसत आहे. आयपीएल इतिहासात सर्वात यशस्वी असलेला संघ मुंबई इंडियन्स देखील यावेळी खराब कामगिरी करताना दिसत आहे. मात्र, कालच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळत पराभवाची साखळी तोडली आहे.
मुंबई इंडियन्सने काल दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव करून आयपीएल २०२५ मध्ये दुसरा विजय नोंदवला आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत २०५ धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात दिल्लीला फक्त १९३ धावा करता आल्या. मजबूत फलंदाजी असलेली दिल्ली फक्त १९ षटकांतच सर्वबाद झाली.
https://twitter.com/IPL/status/1911484926018400415
मुंबईने दिलेल्या २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, दिल्ली कॅपिटल्सला प्रभावी बॅटिंग करता आली नाही. मुंबईच्या बॉलर्ससमोर दिल्ली कॅपिटल्सची बॅटिंग लाईन पूर्णपणे कोसळल्याची दिसली. मुंबईने सुरुवातीपासूनच दिल्लीवर दबाव कायम ठेवला होता. अशातच दिल्लीला फक्त १९३ धावाच करता आल्या आणि संघ पूर्णबाद झाला.