Tuljapur Drugs Racket: तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे 15 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. या कारवाईत पोलिसांनी 2.5 लाख रुपये किमतीचे 59 पुड्या ड्रग्ज जप्त करत काही आरोपींना अटक केली. त्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे संपूर्ण राज्यात राज्यात खळबळ उडाली होती.
नुकतीच या प्रकरणाबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. आता तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात दोष आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तब्बल 10 हजार पानांचे दोष आरोपपत्र धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयात दाखल झाले आहे. दोश आरोपपत्रात कोणत्या आरोपीचा काय रोल होता, हे नमूद करण्यात आल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. तसेच आरोपींचा एकमेकांशी संपर्क कसा झाला, आरोपींच्या बॅंक खात्याची माहितीही दोष आरोपपत्रात देण्यात आली आहे.
या प्रकरणात आतापर्यंतर 35 आरोपी निश्चित झाले असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यातील 14 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली असून 21 आरोपी फरार आहेत. पोलिसांच्या तपासात या ड्रग्स तस्करीचे जाळे मुंबई, सोलापूर आणि पुणे शहरांपर्यंत पसरलेले असल्याचे समोर आले आहे. आता महाराष्ट्रातील मोठ्या ड्रग्ज प्रकरणांपैकी तुळजापूर ड्रग्ज प्रकरण एक मानले जात आहे.
या ड्रग्ज प्रकरणात काही दिवसांपूर्वी तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील काही पुजाऱ्यांची नावे समोर आली आहेत. त्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. जवळपास 13 पुजाऱ्यांचा या तस्करीत सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे तुळजापूर शहरात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.