इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या ३१ व्या सामन्यात, पंजाब किंग्जने त्यांच्या गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सचा १६ धावांनी पराभव केला. मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जला फक्त १११ धावाच करता आल्या. एवढ्या कमी धावांचे लक्ष देऊनही केकेआर पंजाब समोर जिंकू शकला नाही. पंजाबच्या बॉलर्सनी शानदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला.
प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाची सुरुवात चांगली झाली. पहिल्या तीन षटकांतच टीमची धावसंख्या ३९ पर्यंत पोहोचली. यानंतर मात्र , एकामागून एक विकेट पडत गेली आणि खेळाडू तंबूत परतू लागले. अशास्थितीत संपूर्ण संघ १९.४ षटकांत फक्त १११ धावा करू शकला.
https://twitter.com/PunjabKingsIPL/status/1912236297818894576
पंजाबने दिलेल्या ११२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात चांगली झाली व संघाने पॉवरप्लेमध्ये ५० धावा केल्या. पण कर्णधार अजिंक्य रहाणे बाद होताच सामन्याने वेगळे वळण घेतले आणि केकेआरचा डाव डळमळीत झाला. संघाने फक्त ७ धावांत (७२ ते ७९ दरम्यान) पाच विकेट गमावल्या आणि १५.१ षटकांत संघ ९५ धावांवर सर्वबाद झाला.
पंजाबच्या विजयात युजवेंद्र चहल आणि मार्को जानसेन हिरो ठरले. चहलने या सामान्यत चार तर मार्को जानसेनने तीन विकेट घेतल्या. तर अर्शदीप सिंग, झेवियर बार्टलेट आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.