उत्तर प्रदेशमध्ये १४ एप्रिलच्या रात्री अलीगढ जिल्ह्यातील अत्रौली शहरात एका हॉटेलमध्ये वादाची घटना घडली. सुभाष चौक भागात असलेल्या ख्वाजा हॉटेल मध्ये हात पुसण्यासाठी लावलेल्या कागदांवर देवी-देवतांची चित्रे आणि ‘भारत मातेची आरती’ छापलेली होती. हे पाहून बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले आणि त्यांनी हॉटेलमध्येच गोंधळ घातला.
हॉटेलमधील या कागदांचा उपयोग स्वच्छतेसाठी केला जात होता, शिवाय तिथे मांसाहारी जेवणही बनत होते. त्यामुळे हे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लोकांना शांत करत हॉटेलमालक सलीम याला अटक केली. पोलिसांनी त्या कागदपत्रांवरून गौरव शर्मा यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला.या तक्रारीमध्ये धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे म्हंटले आहे.यावेळी वैभव वार्ष्णेय, धर्मेंद्र, संस्कार गौर, मोहन वर्मा, अभिषेक, जितेंद्र राजपूत हे बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यासांदर्भात माहिती देताना पोलिस अधिकारी सीओ सर्जना सिंह म्हणाल्या की, हॉटेल मालक सलीमला शांतता भंग केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. तसेच त्याला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले, जिथून त्याला जामीन मिळाला. या घटनेत हॉटेलमालकाने वापरलेल्या कागदांवर धार्मिक प्रतीके आणि माहिती होती, ज्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. यावर स्थानिक लोक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्याने पोलिसांनी योग्य ती कारवाई करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे आणि कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून संबंधित व्यक्तीला अटक केली आहे.
गेल्या काही वर्षात उत्तर प्रदेशात योगीं आदित्यनाथ यांचे सरकार आल्यापासून राज्याचा विकास झपाट्याने होत असल्याचे दिसत आहे. रस्ते, आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक वेगवान झाली आहे. शिवाय गुन्हेगारी देखील कमी झाली असल्याचे दिसून येते. पण असे असले तरी जेंव्हा अशा छोट्या मोठ्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या घटना घडतात तेंव्हा सामाजिक शांतात भंग पावते. वस्तूतः धार्मिक भावना ही अतिशय संवेदनशील बाब आहे त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी याबद्दल विशेष खबरदारी घेणे आवशक आहे