बसने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एक महत्वाचा व मोठा निर्णय घेतला आहे. खरं तर जेव्हा आपण एसटीने प्रवास करतो त्यावेळी एसटीचे ठरलेले हॉटेल्स थांबे असतात. आणि याच थांब्यांनावर प्रवाशांना जेवण करावे लागते.
पण काहीवेळा या हॉटेल्स थांब्यांवरचे जेवण बेचव तसेच याठकाणी व्यवस्थित बसण्याची व्यवस्था नसते. मुख्य म्हणजे महिलांसाठी स्वछतागृहांची नीट व्यवस्था नसते. अशास्थितीत प्रवाशांचे हाल-हाल होतात. या गोष्टी लक्षात घेत सरनाईक यांनी हॉटेल्स थांब्यांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तपासणी दरम्यान जर या हॉटेल्सच्या बाबतीत कोणत्याही तक्रारी असतील तर त्या हॉटेल्सचे नाव यादीतून रद्द करण्यात यावे. असेही निर्देश त्यांनी दिले आहेत.
लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा मिळत नसतील तर असे थांबे रद्द करा असे आदेश प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. या संदर्भात सध्या सुरू असलेल्या सर्व थांब्याचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पुढील १५ दिवसात सादर करण्यास सांगितले आहे.
प्रवाशांना चांगली सुविधा न देणाऱ्या हॉटेल -मोटेल थांबे रद्द करण्याचे दिले निर्देश#PratapSarnaik #TransportMinister #msrtc @msrtcofficial pic.twitter.com/YifMaTsGMR
— Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) April 16, 2025
प्रवासादरम्यान, एसटी बसेस विविध धाब्यावर थांबतात. तेथे प्रवाशांना चहा -नाष्टा अथवा जेवण तसेच नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो. परंतु अनेक हॉटेलमधील थांब्या बाबत प्रवाशांच्या तक्रारी येत असून, प्रामुख्याने प्रसाधनगृहे अस्वच्छ असणे, फराळाचे जिन्नस शिळे, अशुद्ध व महाग जेवण, याचबरोबर संबंधित हॉटेल वरील कर्मचारी व मालकांची वर्तणूक एस टी प्रवासांच्या सोबत अत्यंत वाईट असणे, अशा प्रकारच्या तक्रारी वारंवार येत होत्या. याच तक्रारींची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.