Devendra Fadnvis:आता राज्यातील अपघातग्रस्तांना तातडीने आणि विनाखर्चिक उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार करता येणार आहे. तसेच तसेच राज्यातील आणि परराज्यातील व्यक्तीचा महाराष्ट्रात अपघात झाल्यास त्याला कोणत्याही रुग्णालयात उपचार घेता येतील, असा मोठा निर्णय आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतला आहे.
तसेत रुग्णांना वेळेवर दर्जेदार आणि कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी रुग्णालये, सोसायटीचे अधिकारी व अंमलबजावणी संस्थांना कठोर दक्षता बाळगावी लागेल. यात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार अंगीकृत व अन्य तातडीच्या रुग्णालयांमधून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश आबिटकर यांनी दिले आहेत.
या योजनेची वैशिष्ट्य नेमकी काय असणार आहेत:
-रुग्णांना सात दिवसांपर्यंत 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार मिळतील.
-आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध असणार आहे.
-राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण पोलीस, रुग्णालये आणि राज्य आरोग्य संस्थांच्या सहकार्याने या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.
-अपघाताची माहिती पोलिसांना २४ तासांच्या आत दिल्यास रुग्णांना या योजनेचा लाभ मिळेल.
या योजनेची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. या निर्णयामुळे रस्त्यांवरील अपघातांमध्ये जखमी होणाऱ्या गरीब आणि गरजू लोकांना मोठा आधार मिळणार आहे. अनेकदा वेळेवर आर्थिक मदत न मिळाल्याने उपचारांना विलंब होतो आणि त्यामुळे रुग्णांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. आता या नवीन योजनेमुळे तातडीने उपचार सुरू करणे शक्य होणार आहे.