समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा लवकरच पूर्ण, मुंबई-नाशिक प्रवासात मोठी बचत समृद्धी महामार्गाचे शेवटचे 76 किमीचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. भिवंडी ते इगतपुरी दरम्यानचा हा टप्पा 2 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू होण्याची शक्यता आहे. या टप्प्यानंतर संपूर्ण 701 किमीचा समृद्धी महामार्ग नागपूरपासून मुंबईपर्यंत सुरू होईल. यामुळे मुंबई ते नाशिक प्रवासात जवळपास 1 तासाची बचत होणार आहे. आता मुंबईहून नाशिक फक्त 8 तासांत गाठता येणार आहे. सह्याद्रीतून जाणारा सर्वात कठीण टप्पा भिवंडी आणि इगतपुरी दरम्यानचा भाग हा डोंगराळ आणि खडकाळ आहे. येथे बोगदे, पूल, आणि घाट भागात काम करणे खूप आव्हानात्मक होते. हा टप्पा पूर्ण झाल्याने संपूर्ण महामार्ग पूर्णत्वास येईल.
तिसऱ्या टप्प्याची खास वैशिष्ट्ये:
एकूण 5 बोगदे– एकत्रित लांबी 11 किमी
इगतपुरी बोगदा – 8 किमीचा जगातील सर्वात रुंद बोगदा
कसारा घाटाच्या प्रवासात मोठी बचत – 25 मिनिटांचा प्रवास आता फक्त 8 मिनिटांत
बोगद्यात आधुनिक अग्निशमन आणि सुरक्षा यंत्रणा
10 जिल्ह्यांतून जाणारा महामार्ग
हा महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर आणि ठाणे या 10 जिल्ह्यांतून जातो. या महामार्गावर 50 उड्डाणपूल, 5 बोगदे, 300 वाहनांसाठी अंडरपास, 400 पादचारी अंडरपास असतील.
हा महामार्ग पूर्ण झाल्यावर नागपूर ते मुंबईचा प्रवास जलद, सुरक्षित आणि अधिक आरामदायक होणार आहे.
2 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या टप्प्याचे उद्घाटन झाले तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा “विकासपुरुष” अशी इमेज पुन्हा एकदा अधोरेखित होईल. तसेच यामुळे पश्चिम महाराष्ट्र, विशेषतः ठाणे, नाशिक आणि मुंबई परिसरातील मतदारांमध्ये विकासाच्या मुद्द्यावरून प्रभाव पडू शकतो. ज्याचा भाजपला आगामी काळात फायदा होऊ शकतो. तसेच यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील मतदारांमध्ये सकारात्मक लाट निर्माण होऊन भाजप महायुतीला मोठा जनाधार मिळू शकतो.