Dr Shirish Valsangkar News:सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी १८ एप्रिल रोजी रात्री ८. ३० वाजता स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूरमधील मोदी परिसरात असलेल्या त्यांच्या घराच्या बेडरूममध्ये त्यांनी स्वतःवर गोळी झाडत जीवन संपवले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
वळसंगकर यांना बेशुद्धवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉ. शिरीष वळसंगकर हे अत्यंत गंभीर जखमी असल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये डॉ. शिरीष वळसंगकर यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले त्याच रूग्णालयात त्यांचा मृत्यू झाला आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर हे अत्यंत प्रसिद्ध न्युरोफिजिशियन होते. केवळ सोलापूर आणि महाराष्ट्रच नाही तर जगभरात त्यांनी विविध रुग्णालयात वैद्यकीय सेवा बजावली आहे. त्यांनी टोकाचे पाऊले का उचलले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या मृत्यूनंतर त्यांना पाहण्यासाठी सोलापूरातील नागरिकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. परंतु त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय का घेतला हे पाहणेही तितकेच महत्वाचे ठरणार आहे.