Bangladesh News:जेव्हापासून बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचे सरकार कोसळून मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार स्थापन झाले आहे, तेव्हापासून बांगलादेशमध्ये हिंदूवर सातत्याने हल्ले होत आहेत. त्यातच आता बांग्लादेशच्या उत्तरेला असलेल्या दिनाजपूर जिल्ह्यात हिंदू समुदायाच्या भावेश चंद्र रॉय या प्रमुख नेत्याला घरातून किडनॅप अत्यंत निदर्यतेने त्याला मारहाण करुन त्याची हत्या करण्यात आली आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा बांगलादेशातील हिंदूच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बांगलादेशात सध्या जवळपास 1 कोटी 31 लाख हिंदू लोक राहत आहे. टक्केवारीनुसार सध्या बांगलादेशात 8 टक्के हिंदू लोक आहेत. विशेष म्हणजे बांगलादेशच्या स्थापनेवेळी बांगलादेशात ३२ टक्के हिंदू होते. यावरून बांगलादेशात हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराचा अंदाज लावता येईल.
-ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. या प्रकरणात हिंदू लोकांचा काहीही संबंध नसताना हिंदूंच्या घरे, व्यवसाय आणि प्रार्थनास्थळांवर हल्ले झाल्याचे पाहायला मिळाले.
– ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेशात अल्पसंख्यांकांविरुद्ध २००० हून अधिक हिंसाचाराच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. यामध्ये १७०५ हिंदू कुटुंबे थेट बाधित झाली. अर्थातच त्यांच्या मालमत्तेची तोडफोड, लूट आणि जाळपोळ करण्यात आली होती.
-गेल्या काही महिन्यांत जवळापास १५० हिंदू मंदिरांवर हल्ले झाले आहेत आणि मूर्तींची विटंबना करण्यात आली आहे.
– बांगलादेशमधील इस्कॉनचे माजी नेते चिन्मय कृष्णादास हे सुद्धा गेली कित्येक महिने देशद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत आहे. चिन्मय कृष्णा यांची बाजू मांडणाऱ्या वकिलावर सुद्धा हल्ला केला गेला होता.
-त्यातच आता पुन्हा भावेश चंद्र रॉय या हिंदू समुदायाच्या नेत्याची हत्या म्हणजे हे सगळे क्रुरतेचे पलिकडचे आहे.
विशेष म्हणजे पाकिस्तानच्या अत्याचाराला कंटाळलेले लोक स्वतंत्र राष्ट्राची मागणी करू लागल्याने बांगलादेशची निर्मीती झाली. निर्मितीच्या वेळी भारताने बांगलादेशला पुरेपुर मदत केली होती. भारताने बांगलादेशला अनेक विकास प्रकल्पांसाठी आर्थिक मदतही केली आहे. परंतु हाच बांगलादेश आता पाकिस्तानशी जवळीक वाढवू लागला आहे. उलट आता बांगलादेशामध्ये हिंदू सुरक्षित नाहीत.
या घटनांवरून बांगलादेशातील हिंदू समुदाय असुरक्षित वातावरणात जगत असल्याचे दिसून येते. भारत सरकारनेही अनेकदा अशा घटनांवर चिंता व्यक्त केली असून बांगलादेश सरकारला अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी कठोर पाऊले उचलण्याची मागणी केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील बांगलादेशातील परिस्थितीची दखल घेतली गेली आहे आणि बांगलादेश सरकारवर अत्याचार थांबवण्यासाठी दबाव वाढला जात आहे. पंरतु तरीही अद्याप तेथील हिंदूवरील अत्याचार थांबले नाहीत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारे प्रयत्व अधिक प्रभावी बनवण्याची गरज आहे, जेणेकरून बांगलादेशातील अल्पसंख्यांकावरी अत्याचार थांबतील आणि सुरक्षित आणि सन्मानाने जगू शकतील.