दिल्लीत सध्या एक प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे ज्याची देशभरात चर्चा सुरु आहे. दिल्लीतील सीलामपुरमध्ये एका १७ वर्षीय हिंदू तरुणाची चाकूने हत्या केल्यानंतर दिल्लीतील वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून लोक रस्त्यावर उतरले असून, हातात पोस्टर घेऊन निदर्शने करत आहेत. या पोस्टर वर ‘हिंदू स्थलांतरित करत आहेत मदत करा.’ असे लिहिले आहे. नेमकं प्रकरण काय आहे पाहूया…
गुरुवारी संध्याकाळी सीलामपुरच्या जे-ब्लॉकमध्ये एका १७ वर्षीय मुलाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. मृत मुलाचे नाव कुणाल असे आहे. कुणालच्या कुटुंबातील सदस्यांचा आरोप आहे की, मुस्लिम समाजातील चार ते पाच मुलांनी त्यांच्या मुलाची हत्या केली आहे. अशातच हे प्रकरण पेटले असून, स्थानिक लोक कुणालसाठी रस्त्यावर उतरून न्यायाची मागणी करत आहेत.
तसेच या परिसरातील हिंदू कुटुंबांनी त्यांच्या घराबाहेर ‘हिंदू स्थलांतरित होत आहेत’, ‘हे घर विक्रीसाठी आहे’ आणि ‘योगी जी कृपया मदत करा’ असे पोस्टर्स लावले आहेत. सीलामपुर परिसरातील हिंदू कुटुंबीयांमध्ये ही भीती पहाता. हे लक्षात येते की, याठिकाणी हिंदू सुरक्षित नाहीत.
दुसरीकडे, दिल्ली सरकारचे गृहमंत्री आशिष सूद यांनी सीलमपूर हत्याकांडाची दखल घेत दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, सुरक्षा व्यवस्था कडक करावी आणि आरोपी आणि अटक केलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी असे आदेश दिले आहेत.