पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी हा दौरा करत आहे. पंतप्रधान २२ व २३ एप्रिल अशा दोन दिवशीय दौऱ्यावर असतील. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याची माहिती भारतीय राजदूत सुहेल एजाज खान यांनी दिली आहे.
पंतप्रधान मोदी सौदी अरेबियातील शहर जेद्दा याठिकाणी उतरतील. याचठकाणी ते क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतील. सौदी अरेबियातील जेद्दा शहर हे उमरा आणि हजसाठी येणाऱ्या यात्रेकरूंसाठी एक महत्वाचे बंदर आहे.
याठिकाणी पंतप्रधान मोदी आणि क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे दोन्ही नेते स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कौन्सिलच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. पंतप्रधानांच्या या भेटीदरम्यान दोन देशांमध्ये मोठ्या संख्येने व्यापार करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.
https://x.com/narendramodi/status/1914523173590028453
दरम्यान, यापूर्वी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पंतप्रधानांच्या या भेटीची माहिती दिली होती. भारत आणि सौदी अरेबियामधील संबंधांसाठी ही भेट खूप महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले होते.
पंतप्रधान मोदींनी या दौऱ्यापूर्वी क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यासोबतच भारताचे चांगले संबंध असल्याचे म्हंटले आहे. दोन्ही देशातील परस्पर समजूतदारपणा आणि उच्चस्तरीय धोरणात्मक विचारसरणीमुळे हे संबंध अधिक मजबूत झाले आहेत. असंही पंतप्रधान म्हणाले आहेत.