जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी (२२ एप्रिल) पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २९ जणांचा मृत्यू झाला आहे. या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
विविध राज्यातील लोक उन्हाळ्याच्या सुट्टीत याठिकाणी आपल्या परिवारासोबत थंडीचा आनंद घेण्यासाठी आले होते. मात्र, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. यात महाराष्ट्रातील पर्यटक देखील आहेत. जे आपल्या परिवारासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी येथे आले होते.
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. मृतांपैकी दोन पर्यटक हे पुण्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे.
पहलगाम दहशतवादी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांमध्ये २ पुण्याचे, ३ डोंबिवलीचे आणि १ पनवेलचा रहिवासी आहे. पुण्यातील मृतांची ओळख संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गंबोटे अशी झाली आहे. डोंबिवली पश्चिमेकडील तीन मृत पर्यटकांची ओळख पटली आहे. त्यांची नावे संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी अशी आहेत. तर पनवेलच्या दिलीप देसले यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. दरम्यान, महारष्ट्रातील काही पर्यटक या हल्ल्यात जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
जम्मू -कश्मीर में हुए इस हमले की मैं कड़ी निंदा करता हूं। मैं स्वयं वहां के स्थानीय प्रशासन के साथ संपर्क में हूं और महाराष्ट्र से इस हमले में जान गँवाने वालों और घायलों को हर प्रकार की मदद पहुंचाने का प्रयास शुरू है।
(मुंबई | 22-4-2025)@ANI #Pahalgam pic.twitter.com/JC3X4kxISQ
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 22, 2025
जम्मू-काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत. असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.