Pahalgam Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे भितीचे वातावरण पसरले आहे. अशातच पर्यटनासाठी कुटुंबासमवेत गेलेल्या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील या श्रीनगरमध्ये अडकून पडल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
रूपाली ठोंबरे पाटील यांनी एका व्हिडिओद्वारे तेथील भीतीदायक परिस्थितीची माहिती दिली आहे. या व्हिडीओद्वारे रूपाली ठोंबरे पाटील यांनी अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे तातडीने मदतीची विनंती केली आहे.
पुणे की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की नेता रूपाली पाटील ठोंबरे और उनके पति ॰ड विजय ठोंबरे पूरे परिवार के साथ कश्मीर घूमने गए हैं और उन्होंने कश्मीर के वर्तमान माहौल के बारे में जानकारी दी।#Pahalgam #Pahalgamterroristattack pic.twitter.com/GVGuxfVrrk
— Ashish rai (@journorai) April 22, 2025
येथे अडकलेल्या पर्यटकांना खास करून ज्यांच्यासोबत लहान मुले आहेत, त्यांना तात्काळ आपापल्या घरी परतण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करावी. कारण हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांच्या सुरक्षित परतीसाठी तातडीने पाऊले उचलण्याची गरज आहे, अस मत त्यांनी व्हिडीओद्वारे व्यक्त केले आहे.
दरम्यान, या हल्ल्यात धर्म विचारून पुरूषांना टार्गेट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवादी हे पोलिस युनिफॉर्ममध्ये आले होते या हल्ल्यामागे टीआरएफ दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतात यापूर्वीही मोठे दहशतवादी हल्ले झाले होते.