Pahalgam Terrorist Attack: २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देश हादरला आहे. या भयानक हल्ल्यात २७ नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी आहेत. याच हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे.
आज संरक्षण मंत्रालयात सुमारे तीन तास एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत हल्ल्याला बदला कसा घेता येईल, यावर सखोल चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. काही संभाव्य पर्यायादेखील सुचवण्यात आले आहेत. हे पर्याय सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादर केले जाणार आहेत.
आज संध्याकाळी ६ वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकदेखील नियोजित आहे. गृहमंत्री अमित शाह या बैठकीला हजर राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत कशावरती चर्चा होईल, हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आता भारतीय सैन्य दलांना ‘अलर्ट मोड’ वर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या हल्ल्याचा बदला घेतला पाहीजे, अशी भावना आता अखंड भारत व्यक्त करत आहे.