काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला आहे की, अशा हल्ल्यांना आता कडक उत्तर दिले जाईल.
भारताची कारवाई सुरू
भारत सरकारने पाकिस्तानच्या नागरिकांना दिलेले व्हिसा रद्द केले आहेत आणि पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याचा पुरवठा थांबवण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर, भारतीय हवाई दलाने हालचाली सुरू केल्यामुळे पाकिस्तानमध्ये दहशतवादी ठिकाणांवर कारवाई होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पाकिस्तानकडून प्रतिक्रिया
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला इशारा देत सांगितले की, “आम्ही शांतता राखू इच्छितो, पण कोणी चिथावणी दिली तर आम्ही शांत बसणार नाही.” त्यांनी भारताने जर पाण्याचा पुरवठा थांबवला, तर ते आंतरराष्ट्रीय कराराचा भंग असेल, असेही त्यांनी म्हंटले आहे.
सिंधू पाणी कराराची चर्चा
या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने राष्ट्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सिंधू नदी पाणी करार हा मुख्य मुद्दा असणार आहे. पाकिस्तानने जगाला देखील या विषयात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.
भारत-पाक तणाव वाढतोय
भारताने घेतलेल्या कडक निर्णयांमुळे पाकिस्तानमध्ये राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अस्थैर्य निर्माण होण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा थांबवण्याचा विचार पाकिस्तानसाठी मोठे संकट ठरू शकतो.
भारताच्या निर्णयाने पाकिस्तानमध्ये केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक आणि आर्थिक अस्थैर्य निर्माण होण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा थांबवण्याची शक्यता पाकिस्तानसाठी गंभीर संकट ठरू शकते, आणि त्यामुळेच त्यांचे सरकार जागतिक पातळीवर हस्तक्षेपाची अपेक्षा ठेवून आहे. खरतर भारत आता संयम राखून, पण गरज भासल्यास प्रभावी आणि कडक पावले उचलण्यास तयार आहे. त्यामुळे पुढील काळात भारत-पाक संबंध कोणत्या वळणावर जातात, याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे.