Operration Sindur: २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण भारत हळहळ व्यक्त करत होता. त्यामुळे या हल्ल्याचा बदला घेतला जावा अशी प्रत्येक भारतीयाची भावना होती. अखेर ज्या क्षणांची प्रतीक्ष भारतीय करत होते अखेर तो क्षण उजडलाच. भारताने या हल्ल्याचा बदला म्हणून ७ मे राजी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली आहे. भारतीय वायुदलाकडून हा यशस्वी स्ट्राईक करण्यात आला आहे.
परंतु पाकिस्तानकडून देखील या हल्ल्याचा प्रत्युत्तर दिले जाईल, अशा चर्चा सुरू आहे. कारण २०१९ मध्ये भारताने केलेल्या बालकोट हवाई हल्ल्यानंतरही पाकिस्तानने कारवाई केली होती. आता भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतरही आंतररराष्ट्रीय सीमेवर आणि प्रत्येक्ष ताबारेषेवर पाकिस्तानने तोफगोळ्यांचा मारा सुरू केला आहे. या तोफगोळ्यांच्या माऱ्यामध्ये काही भारतीय ठार झाल्याचे बातम्या समोर येत आहेत. तसेच पाकिस्तानने कारवाईदरम्यान भारताची विमाने पाडल्याचा दावा केला आहे.
पाकिस्तानला युद्ध न परवडणारे:
पाकिस्तानचे नेते त्यांच्या लष्करी सामर्थ्याबद्दल, अणुसामर्थ्याबद्दल वरचढ असल्याचा दावा करत असले तरी भारत पाकिस्तानपेक्षा अण्वस्त्रसज्ज आणि संख्यात्मक वर्चस्वात वरचढ आहे हे वास्तव आहे. लष्करी शक्तीबद्दल बोलायचे झाल्यास ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार, 2025 मध्ये हवाई ताफ्याच्या ताकदीसाठी विचारात घेतलेल्या १४५ देशांपैकी भारत चौथ्या क्रमांकावर आहे तर पाकिस्तान ७ व्या क्रमांकावर होता.नौदल ताकदीच्या बाबतीत विचारात घेतलेल्या१४५ देशांपैकी भारत सहाव्या क्रमांकावर आहे तर पाकिस्तान २७ व्या क्रमांकावर होता.त्यामुळे पाकिस्तानला भारतासोबत समोरसमोर लढणे अनेक अंगांनी न परवडणारे आहे.