Operation Sindoor: भारताने ७ मे रोजी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली आहे. या ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी भारतीय लष्कराकडून आज पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरची महत्वपूर्ण माहिती भारतील लष्कर आणि भारतीय हवाई दलाच्या महिला अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आज या दोन महिला अधिकाऱ्यांची आणि स्री सक्षमीकरणाची चर्चा सर्वत्र होत आहे. विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी अशी या दोन महिला अधिकाऱ्यांची नावे आहेत.
कोण आहेत कर्नल सोफिया कुरेशी?
कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावरील अधिकारी आहेत. वयाच्या १७ व्या वर्षी म्हणजेच 1999 मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत त्या सैन्यात सामील झाल्या आहेत. त्या सध्या सिग्नल कॉर्प्समध्ये सेवा देतात. कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला अधिकारी आहेत, ज्या लष्कराच्या प्रशिक्षण सराव ‘एक्सरसाइज फोर्स 18’ कार्यक्रमाचे नेतृत्व करत आहेत. विशेष म्हणजे त्यांचे आजोबा आणि वडिलही भारतीय सैन्यात होते.
कोण आहेत व्योमिका सिंग?
व्योमिका सिंग या भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर आहेत. व्योमिका सिंग यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नॅशनल कॅडेट कॉर्प्समध्ये सामील झाल्या होत्या. व्योमिका सिंग यांनी 2500 पेक्षा जास्त उड्डाण तास पूर्ण केले आहेत. त्यांना 2019 मध्ये भारतीय हवाई दलाच्या उड्डाण शाखेत कायमस्वरूपी बढती मिळाली आहे. विशेष बाब म्हणजे जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतासारख्या कठीण प्रदेशात चेतक आणि चित्ता हेलिकॉप्टर त्यांनी चालवले आहेत. त्यांच्या साहसाची साक्ष देणारी आणखी एक बाब म्हणजे 2021 मध्ये व्योमिका सिंग यांनी 21,50 फूट उंच माउंट मणिरंगवर त्रि-सेवा महिला गिर्यारोहण मोहिमेत भाग घेतला होता.
#Noor_e_Hind #Sophia_Kureshi#Wg_Cdr_Vyomika_Singh
First Woman to Lead an Army Contingent.
भारत की वह बेटियां, जिन्होंने गीदड़ों का वध करके दुनिया को उसके बारे में बताया ।#Noor_E_Hind#Col_Sophia_Kureshi#Wg_Cdr_Vyomika_Singh@adgpi @IAF_MCC @indiannavy @IndiaCoastGuard pic.twitter.com/d4Nj3ko2UA
— SUBODH JAIN (@PressSubodhJain) May 7, 2025
दरम्यान, आज विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत महत्वपूर्ण माहिती देत भारताचा निर्धार आणि सैन्यातील महिलांची ताकद ठामपणे मांडली आहे. त्यामुळे आज सर्वत्र कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. एक्सवर देखील ‘नारी शक्ति’ ट्रेन्ड पाहायला मिळत आहे. तसेच भारतातील महिला देखील पाकिस्तानवर भारी आहेत, असा संदेश देखील यानिमित्ताने जातो.