बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांचे चित्रपट क्षेत्रातील योगदान मोठे आहे. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक विनोदासोबत सकस गंभीर आणि विविध व्यक्तिरेखा साकारून आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे.
सध्या विवेक अग्नीहोत्रीच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटातील भुमिकेने ते प्रेक्षकांची मने जिंकत आहे.आता अनुपम खेर अयोध्या हनुमानगढ़ीसह भारतातील 21 हनुमान मंदिरांच्या पार्श्वभूमीशी संबंधित ऐतिहासिक डॉक्युमेंटरी तयार करणार आहेत. रामजन्मभूमी परिसराजवळील श्रीराम देवस्थान मंदिराचे त्यांनी दर्शन घेतले आणि पूजा केली. त्याचबरोबर तिथल्या संतांच्या भेटीही घेतल्या.संकटमोचन हनुमान यांची मंदिरे आणि त्यांचे महत्त्व यावर आधारित त्यांच्या कंपनीने बनवलेली डॉक्युमेंट्री फिल्म त्यांनी नुकतीच लाँच केली आहे .
यावेळी त्यांनी सांगितले की, त्यांच्या आईचे स्वप्न आहे की त्यांनी अयोध्येला येऊन श्रीरामाचे दर्शन घ्यावे. राम मंदिरात रामाची मुर्ती बसवल्यानंतर मला निमंत्रण मिळाले तर मी माझ्या आईसोबत दर्शनासाठी येईन, कारण तिची श्री रामाला पाहण्याची खूप इच्छा आहे. मी फक्त देवाकडे सुख आणि शांती मागतो, असेही ते यावेळी म्हणाले आहेत.