आज म्हणजेच १५ जानेवारी रोजी भारतीय लष्कर दिन साजरा करण्यात येतो.
त्याचनिमित्ताने उत्तर प्रदेशमधील लखनौमध्ये सोमवारी ७६ वा लष्कर दिन मोठ्या थाटात
साजरा करण्यात आला. या समारोहाचे आयोजन मेजर जनरल सलील सेठ यांच्या नेतृत्वाखाली
लखनौच्या ११ गोरख रायफल्स रेजिमेंटल सेंटरच्या परेड ग्राउंडमध्ये करण्यात आले
होते. यावेळी परेडनंतर भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी जवानांना
संबोधित केले. भारतीय सेना आणि सरकारच्या सततच्या प्रयत्नांमुळे मणिपूर राज्यातील
परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले आहे तसेच स्थानिक बंडखोर गटांशी शांततेवर
चर्चा केल्याने ईशान्य भागात सकारात्मक विकास झाला आहे,असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे
म्हणाले.
जवानांना संबोधित करताना मनोज पांडे म्हणाले, ”गेल्या काही वर्षांमध्ये उत्तर-पूर्व
भागात स्थानिक बंडखोर गटांसह महत्वाचे शांतता करार आणि वाटाघाटी झाल्या आहेत.
त्याचा परिणाम म्हणून, या
भागात सकारात्मक विकास झाला आहे. सरकारी धोरणांमुळे शांतता प्रस्थापित करण्यात मदत
झाली आहे. मणिपूरमध्ये सरकारची सक्रियता आणि भारतीय सेनेच्या प्रयत्नांमुळे
परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश मिळत आहे. संवेदनशीलतेच्या या कठीण वातावरणात
आपल्या सैनिकांनी संयमाने काम करून नुकसान कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली
आहे.” तसेच
जम्मू-काश्मीरमधील पश्चिम सीमेवरील परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. मात्र गेल्या
काही महिन्यांपासून अनेक भागांमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाल्याचे दिसून
येत आहे.
प्राथमिकता आहे. पश्चिम सीमेवरील जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे.
मात्र गेल्या काही महिन्यांपासून काही भागात दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाल्याचे
दिसून आले आहे. नियंत्रण रेषेवर (एलओसी) युद्धविराम आहे परंतु घुसखोरीच्या
प्रयत्नांवरून हे स्पष्ट होते की सीमेपलीकडे दहशतवाद अजूनही अस्तित्वात आहे. ”
दरम्यान, ७६ व्या लष्कर दिनानिमित्त झालेल्या परेडनंतर पॅराट्रूपर्सच्या
स्कायडायव्हिंग डिस्प्ले आणि डेअरडेव्हिल जंप, कॉर्प्स ऑफ सिग्नल्स डेअरडेव्हिल टीमने डेअरडेव्हिल मोटरसायकल
डिस्प्ले आणि ALH ध्रुव
आणि ALH रुद्र
हेलिकॉप्टरचा समावेश असलेल्या आर्मी एव्हिएशन कॉर्प्सच्या हेलिकॉप्टरद्वारे
फ्लाय-पास्ट करण्यात आला.