येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा
केली जाणार आहे. तब्बल ५०० वर्षांच्या संघर्षानंतर रामभक्तांचे स्वप्न पूर्ण होणार
आहे. कार सेवकांनी केलेल्या त्यागाला,संघर्षाला अखेर यश आले आहे. २२ तारखेला अयोध्येत श्रीराम मंदिराचे
उदघाटन होणार आहे. मात्र राम मंदिराच्या उद्घटनाआधीच एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी
यांनी एक विधान केले आहे. असदुद्दीन ओवैसी एका सभेला संबोधित करत होते. त्यावेळी
त्यांनी आपल्या मशिदीचे संरक्षण करण्याची गरज असल्याचे विधान केले आहे.
असदुद्दीन ओवैसी एका सभेला संबोधित करताना म्हणाले, ”आपल्या मशिदीचे संरक्षण करा. आपल्या
मशिदीचे महत्व कमी करण्याचा ते पूर्ण प्रयत्न करत आहेत. आता आपली जबाबदारी आहे की, आपण मशीदींचे संरक्षण केले पाहिजे.
मुसलमानांना इस्लामपासून दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आधीच आपण आपली एक मशीद
गमावली आहे. मुसलमानांना मशिदीपासून दूर केल्यास त्यांच्याकडे काहीही राहणार नाही
हे त्यांना माहिती आहे.” असदुद्दीन
ओवैसी यांचा हा व्हिडीओ एमआयएमने ‘एक्स‘वर शेअर केला आहे.
तसेच आपल्या भाषणात ओवैसी म्हणाले, ”ज्या वेळी तुम्ही मशिदीमध्ये जाल तेव्हा एकटे जाऊ नका. तर आपल्या
मुलांना देखील घेऊन जा. फक्त जुम्म्याच्या दिवशी नव्हे तर प्रत्येक दिवशी
मशिदीमध्ये नमाजाचे पठण केले पाहिजे. आपल्या मशिदीचे रक्षण करा. ही लोकं आपल्या
मशिदीवरील अजान बंद करण्याच्या मागे लागले आहेत.”
दरम्यान, अयोध्येमध्ये २२ तारखेला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.
त्याची तयारी खूप जोरात सुरु आहे. देशातील अनेक महत्वाच्या लोकांना या सोहळ्यासाठी
निमंत्रण पाठवण्यात आले आहे. तसेच या सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
१४ ते २२ जानेवारीपर्यंत आपल्या परिसरातील मंदिरांमध्ये स्वच्छता करण्याचे आवाहन
केले आहे.