Monday, June 9, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

पंतप्रधान मोदींनी कोचीत 4000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे केले उद्घाटन

param by param
Jan 17, 2024, 09:26 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

कोची : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केरळच्या कोचीमध्ये 4000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या तीन प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) येथील न्यू ड्राय डॉक (NDD), CSL ची आंतरराष्ट्रीय जहाज दुरुस्ती सुविधा (ISRF) आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​पुथुव्‍यपीन, कोची येथे एलपीजी आयात टर्मिनल यांचा समावेश होता.

कोचीमध्ये पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी शेकडो लोकांनी मैदानावर गर्दी केली होती. तर उद्घाटनानंतर कोची येथील एका मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी त्यांचे भव्य स्वागत केल्याबद्दल केरळच्या लोकांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. “कोचीला आल्यावर आनंदी चेहरे पाहून मला खूप आनंद झाला. माझ्या भव्य स्वागताबद्दल तुमचे धन्यवाद. तसेच त्रिशूरच्या गुरुवायूर मंदिरात प्रार्थना करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, “कोची हे देशाचे पुढील जहाज बांधणी केंद्र बनणार आहे. आम्ही बंदरांची क्षमता वाढवण्यासाठी, बंदरांच्या पायाभूत सुविधा निर्माण आणि मजबूत करण्यासाठी आणि सागरमाला परियोजनासारख्या उपक्रमांद्वारे बंदरांची जोडणी वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आज जेव्हा भारत जागतिक व्यापाराचे केंद्र बनत आहे, तेव्हा आम्ही आमची सागरी शक्ती वाढवत आहोत. लवकरच कोची हे त्याचे प्रतीक बनताना दिसेल,” असेही पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.

“या 3 प्रकल्पांमुळे देशाच्या जहाजबांधणी आणि दुरुस्ती क्षमतेला, तसेच सहायक उद्योगांसह ऊर्जा पायाभूत सुविधांच्या वाढीला चालना मिळणार आहे. तसेच अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. त्यामुळे मी केरळच्या लोकांचे अभिनंदन करतो”, असेही मोदी म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी गुरूवायूर  मंदिरात तूप आणि कमळाची फुले अर्पण करत प्रार्थना केली. गुरुवायुर देवस्वोम हे भगवान गुरुवायुरप्पन यांना समर्पित मंदिर आहे आणि हिंदूंसाठी सर्वात महत्वाचे पूजास्थानांपैकी एक आहे.

Tags: NULL
ShareTweetSendShare

Related News

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन
general

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे
general

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.