इराणने पाकिस्तानमधील तेहरानला विरोध करणाऱ्या एका दहशतवादी गटाच्या मुख्य स्थानावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. इराणने एअरस्ट्राईक करत पाकिस्तानमधील जैश अल-अदलची दोन महत्वाची ठाणी उद्दवस्त केली आहेत. याबाबतचे वृत्त अल अरबिया न्यूजने तस्नीम वृत्तसंस्थेचा हवाला देत दिले आहे. त्यानंतर पाकिस्तानने देखील या हल्ल्याला प्रत्युत्तर दिल्याचे वृत्त समोर येत आहे. कारण पाकिस्तानच्या हवाई दलाने इराणमधील कथित बलूच फुटीरतावादी तळांवर हवाई हल्ले केल्याचे वृत्त अनेक माध्यमांनी दिले आहे.
इराणने तेहरानमधील जैश अल अदल या दहशतवादी संघटनेचे मुख्यालयावर इराणने क्षेपणास्त्रे डागली. या इराणच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने देखील इराणचा हल्ला म्हणजे आमच्या देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केल्याचे म्हणत निषेध केला आणि गंभीर परिणामांचा इशारा देखील दिला होता.
पाकिस्तानमधील स्थानिक दैनिकाचे संपादक आणि न्यूयॉर्क टाइम्सचे पाकिस्तानी वार्ताहर सलमान मसूद यांनी एक्स वर एक पोस्ट शेअर केली. ”पाकिस्तानी हवाई दलाने इराणमधील बलुच फुटीरतावादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. हे पाऊल इराणद्वारे करण्यात आलेल्या हल्ल्याच्या एक दिवसानंतर उचलले आहे. दहशतवादी पाकिस्तानच्या हद्दीत आहेत हा दावा पाकिस्तानने फेटाळला आहे.”
इराणने हे हल्ले पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील जैश अल-अदल या दहशतवादी सर्वात मोठ्या ठिकाणावर केल्याचे मीडिया रीपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.अल अरबिया न्यूजच्या रिपोर्टनुसार, २०१२ मध्ये इराणने जैश अल अदल या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. हा एक सुन्नी दहशतवादी गट आहे जो इराणच्या दक्षिण भागातील सीस्तान-बलुचिस्तानमध्ये कार्यरत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जैश अल अदलने इराणी फौजांवर अनेकदा हल्ले केले आहेत. अल अरेबिया न्यूजच्या वृत्तानुसार, डिसेंबरमध्ये जैश अल-अदलने सिस्तान-बलुचिस्तानमधील एका पोलिस स्टेशनवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्या हल्ल्यात किमान ११ पोलीस कर्मचारी मारले गेले होते.