राज्याच्या वातावरणामध्ये सध्या घट झालेली पाहायला मिळत आहे. खासकरून पुण्याच्या तापमानामध्ये घट झालेली दिसून येत आहे. त्यामुळे पुणेकर नागरिक गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. पुणे आणि आसपासच्या भागामध्ये ७ ते ८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. पुणे शहरामध्ये सध्या दिवसभर वातावरण थंड असलेले पाहायला मिळत आहे. आतापर्यंतच्या कालावधीतील हे सर्वात कमी तापमान आहे. येत्या काही दिवसांमध्ये टॅम्पनामध्ये अजून घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात अधिक घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली जात आहे. पुणे जिल्ह्यात गेले एक ते दोन दिवस कमी तापमानाची नोंद झाली आहे. शहरातील पाषाण, शिवाजीनगर, स्वर्गात, कोथरूड या भागांमध्ये कमी तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवड मध्ये देखील कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये नागरिकांना धुक्याची चादर पसरलेली दिसून येत आहे. जिल्ह्यातील रामीं भागांत देखील कमालीचा गारठा असल्याचे पाहायला मिळत आहे.