16 जानेवारीपासून अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा संबंधित 7 दिवसीय धार्मिक विधी सुरू झाले आहेत. आज (18 जानेवारी) या विधींचा तिसरा दिवस आहे. तर रामलल्लाच्या मूर्तीला आज मंदिरात अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर रामलल्लाची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहामध्ये ठेवण्यात आली आहे.
काल (17 जानेवारी) रात्री राम मंदिर परिसरात रामलल्लाची मूर्ती क्रेनद्वारे आणण्यात आली होती. त्यानंतर आज गर्भगृहात रामलल्लाची प्रतिष्ठापना करण्यात आली. आज अनेक प्रकारचे विधी आणि पूजा केल्यानंतर रामलल्लाची मूर्ती गर्भगृहामध्ये ठेवण्यात आली आहे.
https://twitter.com/ANI/status/1747860310965522920
श्री राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, रामलल्लाची मूर्ती आत आणण्यापूर्वी गर्भगृहात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. क्रेनच्या सहाय्याने मूर्ती मंदिरात आणण्यात आली होती. मंदिराच्या गर्भगृहात श्री रामलल्ला यांचे सिंहासन तयार करण्यात आले असून, त्याची उंची 3.4 फूट आहे. या सिंहासनावर प्रभूंची बालस्वरूपाची उभी मूर्ती बसवण्यात आली आहे.
दरम्यान, आज गर्भगृहात प्रवेश करण्यापूर्वी रामलल्लांच्या प्रतिमेची मिरवणूक यात्रा काढण्यात आली होती. ही यात्रा मोठ्या दिमाखात पार पडली. त्यानंतर मंदिरात आनंद रामायणाचे पठण करण्यात आले. तसेच रामलल्लाची विशेष पूजा देखील करण्यात आली. यावेळी शुभ मुहूर्तानुसार प्रधान संकल्प, गणेशांबिका पूजन, वरुण पूजन, चतुर्वेदोक्त, पुण्यवचन, मातृकुपूजन, सोरधारा पूजन, आयुषमंत्र जप, नंदीश्राद्ध, आचार्य धिरित्वविग्वरण, मधुपर्क पूजन, मंगळसूत्र पूजन , पंचगव्यप्रदर्शन , मंडपंगवस्तु पूजन , वास्तु बलिदान , मंडप सूत्र स्थापन , दूध धार, पाणी, सुव्यवस्थित षोडशस्तंभ पूजा , मंडप पूजन , जलाधिवास , गांधादिवास, संध्याकाळची पूजा व आरती करण्यात आली.