येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद मोदी करणार आहेत. प्रभू श्रीराम आपल्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. यानिमित अनेक मान्यवरांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. सध्या अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अनुष्ठानाला सुरुवात झाली आहे. विवध कार्यक्रम या दिवसांमध्ये साजरे केले जाणार आहेत. दरम्यान, राम मंदिराच्या लोकार्पणाआधी अनेक विधी सुरु आहेत. आज नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिराच्या गर्भगृहात रामलल्ला यांची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे.
दरम्यान, राम मंदिराच्या लोकार्पणाआधी अनेक विधी सुरु आहेत. आज नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिराच्या गर्भगृहात रामलल्ला यांची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. हे शुभ कार्य आज सकाळी करण्यात आले. रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी चार तासांपेक्षा जास्त कालावधी लागला. मंत्रोच्चार आणि पूजा केल्यानंतर रामाची मूर्ती स्थापित करण्यात आली. अनेक शतकानंतर रामलल्ला त्यांच्या जन्मस्थानी विराजमान झाले आहेत. २२ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. तसेच अभिषेक देखील केला जाणार आहे.
दरम्यान, राम मंदिराच्या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्याला राजकीय, खेळ, अभिनय, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये रजनीकांत, अनुष्का शर्मा, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.