महुआ मोईत्रा या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार होत्या. डिसेंबर २०२३ मध्ये त्यांना संसदेतून निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान तृणमूलच्या माजी खासदार महुआ मोईत्रा यांनी खासदारकी गेल्यानंतर आपला सरकारी बंगला रिकामा केला आहे. महुआ मोईत्रा यांनी बंगला रिकामा केल्यानंतर त्यांच्या वकिलांनी बंगल्याच्या किल्ल्या अधिकाऱ्यांकडे सोपवल्या आहेत. दरम्यान, याआधी बंगला रिकामा करण्यासाठी मोईत्रा यांच्या घरी एक सरकारी पथक पाठवण्यात आले होते.
दरम्यान, याआधी संपदा संचालनालयाने माजी टीएमसी खासदार मोईत्रा यांना बंगला रिकामा करण्यासाठी अधिकाऱ्यांचे एक पथक पाठवल्याचे एकाने सांगितले. आठवड्याच्या सुरुवातीला संपदा संचालनालयाने माजी टीएमसी खासदार मोईत्रा बंगला रिकामा करण्यासाठी नोटीस पाठवली होती. कारण त्यांना मागच्याच महिन्यात संसदेतून निलंबित करण्यात आले होते.
मात्र खासदार महुआ मोईत्रा यांनी त्यांना आलेल्या नोटीसीविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने संपदा संचालनालयाच्या नोटिसीवर स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच मोईत्रा यांना कोणताही दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला. तसेच बंगला रिकामा करण्यासंदर्भात न्यायालयाने माजी खासदार मोईत्रा यांना निर्देश दिले. मोईत्रा यांना संसदेतून निलंबित करण्यात आल्यानंतर मोईत्रा यांना ९ बी टेलिग्राफ लेनमधील टाईप ५ बंगला रिकामा करण्याचे निर्देश देण्यात आले होते.