येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. त्यानिमित्ताने अयोध्येत अनेक विधींना सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. २२ तारखेला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यापूर्वी म्हणजे काल रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात आणण्यात आली आहे. ही सुंदर मूर्ती कर्नाटकमधील योगीराज अरुण यांनी घडवली आहे. दरम्यान प्राणप्रतिष्ठापने आधी मूर्तीचा चेहरा भविकांसमोर आला आहे. बालरूपातील प्रभू श्रीराम अत्यंत सुंदर, लोभस आणि देखणे दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर या मूर्तीचे फोटो व्हायरल झाले आहेत.
दरम्यान, अयोध्येमध्ये राम राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाल्याने देशामध्ये जल्लोषाचे आनंदाचे वातावरण हे. प्रत्येक जण प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाण्यासाठी आतुर आहेत. २२ तारखेनंतर अयोध्येतील राम मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. रामभक्तांना सहज अयोध्येमध्ये पोहोचता यावे यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. रामभक्तांसाठी पुण्यातून जवळपास १५ रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. रेल्वे प्रशासनाने ३० जानेवारीपासून पुणे ते अयोध्येसाठी पुण्यातून सोडण्यात येणार आहेत.
दरम्यान, राम मंदिराच्या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्याला राजकीय, खेळ, अभिनय, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये रजनीकांत, अनुष्का शर्मा, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर केंद्र सरकारने २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या सोहळ्यानिमित्त देशातील केंद्र सरकारची कार्यालये, केंद्रीय संस्था , केंद्रीय औद्योगिक संस्था दुपारी २.३० वाजेपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.