पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचे लोकार्पण करणार आहेत. तसेच रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. या सोहळ्याला अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्वत्र देशभरामध्ये आनंदाचे, जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर सामान्य नागरिकांना देखील रामलल्लाचे देशां घेता येणार आहे. यानिमित्त स्पाईसजेट एअरलाईन्सने एक मोठी घोषणा केली आहे. देशातील ८ महत्वाच्या शहरांमधून अयोध्येला जाण्यासाठी स्पाईसजेट एअरलाईन्सने विमानसेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता नागरिकांना सहज आणि कमी वेळेत अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या दर्शनाला जाता येणार आहे.
आता सर्व सामान्य नागरिकांना प्रभू श्रीरामाचे दर्श घेणे अधिक सोपे होणार आहे. कारण स्पाईसजेट एअरलाईन्सने ८ शहरांतून अयोध्येला जाण्यासाठी विमानसेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. देशातील अनेक विविध विमान कंपन्यांनी देखील अनेक शहरांमधून अयोध्येला जाण्यासाठी विमाननसेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. आता या यादीमध्ये स्पाइसजेटचे नाव देखील जोडले गेले आहे. स्पाइसजेटने दिल्ली, अहमदाबाद,जयपूर , पाटणा, दरभंगा, चेन्नई, मुंबई आणि बंगळुरू या ८ शहरांमधून अयोध्येला जाण्यासाठी विमानसेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे.
मागील आठवड्यामध्ये स्पाईसजेट कंपनीने २२ जानेवारी रोजी होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठपनेच्या पार्शवभूमीवर स्पाइसजेटने २१ जानेवारी रोजी दिल्ली ते अयोध्या दरम्यान विशेष विमान चालवण्याची घोषणा केली आहे. २२ तारखेला या अद्भुत सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना २२ जानेवारी रोजी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.