राम मंदिराचे लोकार्पण होण्याशी अवघे २ च दिवस उरले आहेत. २२ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण करणार आहेत. तसेच रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. दरम्यान अयोध्येत या सोहळ्याची मोठ्या उत्साहात तयारी सुरु आहे. अयोध्येत अनेक प्रमुख मान्यवर येणार आहेत. तसेच अनेक भाविक देखील अयोध्येत दाखल होत आहेत. त्यादृष्टीने त्या ठिकाणी अत्यंत कडोकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच NDRF ने देखील अयोध्येमध्ये आपला कॅम्प लावला आहे. आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी ही छावणी उभारण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारी रोजी मंदिरात श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. एनडीआरएफचे पोलीस उपमहानिरीक्षक मनोज कुमार शर्मा यांनी एएनआयशी बोलताना मंदिर परिसर आणि शहरात एनडीआरएफच्या तैनातीबद्दल माहिती दिली. ”२२ जानेवारीला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी एनडीआरएफच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या तुकड्यांची तैनाती स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या समन्वयाने करण्यात आली आहे. तसेच एक तुकडी घाटांवर तैनात करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या आपात्कालीन परिस्थतीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहोत. ”
”आम्ही संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक तयारी करत आहोत. ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यासाठी अभ्यागतांचे आगमन आधीच सुरु झाले आहे. आम्ही ड्रोन कॅमेरे आणि AI द्वारे बारकाईने पाळत ठेवत आहोत. सुरक्षेतील सर्व त्रुटी ओळखून त्या दूर केल्या जात आहेत. २२ तारखेला होणार सोहळा कोणत्याही अडथळ्यांशिवाय पार पडेल असा आम्हाला विश्वास आहे”, असे अयोध्येचे आयजी प्रवीण कुमार म्हणाले.