अयोध्येतील श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा क्षण अगदी काही तासांवर येऊन ठेपला आहे. अशावेळी आज म्हणजे प्राणप्रतिष्ठेच्या आदल्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक लेख लिहून समाजाला आवाहन केले आहे. प्रभू श्रीराम धार्मिक दृष्ट्या बहुसंख्यकांचे आराध्य असले तरीही त्यांचे आचरण हे सर्वांसाठीच आदर्श आहे. त्यामुळे या मंगल प्रसंगी सर्वांनी कटुता विसरून एकत्र येऊया असे आवाहन सरसंघचालकांनी लेखाद्वारे केले आहे.
‘भारतामध्ये गेल्या दीड हजार वर्षांपासून अनेक आक्रमकांनी हल्ले केले. सातत्याने इथला हिंदू समाज या आक्रमकांशी झुंजत आहे. प्रामुख्याने लूटमार करण्यासाठी ही आक्रमणे झाली. मात्र जेव्हा इस्लामचे आक्रमण झाले तेव्हा त्यांना इथला समाज व संस्कृती नष्ट करायची होती. त्यामुळे त्यांनी मंदिरे तोडली, धर्म भ्रष्ट केला. एकदा नाही तर अनेकदा केले. त्यामागे उद्देश हाच होता की येथील समाज हतोत्साहित करायचा. अयोध्येतील राम मंदिराचाही विध्वंस याच उद्देशाने केला गेला होता. भारताने कधीच कोणावर स्वतःहून आक्रमण केले नाही. मात्र भारतावर अनेकांनी आक्रमणे केली. अर्थात असे असले तरीही त्यांना अपेक्षित तो परिणाम झाला नाही. येथील समाजाचे मनोबल कमी झाले नाही. श्रद्धा बोथट झाल्या नाहीत. समाज झुकला नाही. संघर्ष निरंतर सुरू राहिला. याच निरंतर संघर्षातून आजचे हे राम मंदिर उभे राहात आहे’ अशा शब्दातं सरसंघचालकांनी आपल्या भावना लेखातून व्यक्त केल्या आहेत.
सरसंघचालकांचे संपूर्ण लेख वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा …