पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील भव्य मंदिरामध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या विधीला सुरुवात झाली आहे. गर्भगृहामध्ये धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे. या धार्मिक विधींसाठी पंतप्रधान मोदींसह गर्भगृहात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित आहेत. गर्भगृहामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विधिवत पूजा केली जात आहे. गणेश पूजनाने विधीला सुरुवात करण्यात आली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी साकेत हेलिपॅडवरून मंदिराच्या उत्तर प्रवेशदारमधून मंदिरात दाखल झाले. यावेळी त्यांनी आजच्या या सोहळ्यासाठी खास पोशाख परिधान केला आहे. पंतप्रधान मोदींनी कुर्ता आणि धोतर असा खास पोशाख परिधान केला आहे. मंदिराच्या परिसरात दाखल झाल्यानंतर मोदी चांदीचे छत्र घेऊन राम मंदिराच्या गर्भगृहात पोहोचले.