उद्या आपल्या देशाचा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. यासाठी राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी सुरु आहे. यानिमित्त दिल्लीमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त फ्रनसचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. राजधानी दिल्ली आणि कर्तव्यपथावर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये तब्बल १४ हजार जवानांना सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. उद्या कर्तव्यपथावर भारतीय सैन्य दलांचे सामर्थ्य अवघ्या जगाला दिसणार आहे. २६ जानेवारी निमित्त राजधानी दिल्लीमध्ये अत्यंत चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दिल्लीच्या विशेष आयुक्तांनी सांगितले, या परेडसाठी ७७ हजारांपेक्षा अधिक पाहुणे कर्तव्यपथावर उपस्थित असणार आहेत. यानिमित्त पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ही सुरक्षा दलाच्या विविध तुकड्या आपापसांत समन्वयाने काम करतील. २५ जानेवारी रोजी रात्री १० वाजल्यापासून दिल्लीच्या सीमा सील केल्या जाणार आहेत. यादरम्यान अवजड वाहने आणि मालवाहू वाहनांची वाहतूक बंद केली जाईल.