बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर देशामध्ये सर्वोच्च समजला जाणारा भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कर्पुरी ठाकूर हे दोनवेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. कर्पुरी ठाकूर यांची या वर्षी १०० वी जयंती होती. त्यानिमित्त केंद्र सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. दिवंगत समाजवादी नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना लोकनेते म्हणून ओळखले जाते. यावर्षी देश त्यांची १०० वी जयंती साजरी करत आहे. दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यान केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल आभार मानले आहेत.
दरम्यान लोकनेते आणि बिहारचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले दिवंगत कर्पुरी ठाकूर यांच्या १०० व्या जयंतीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. कारण मोदी सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे. २०१९ पासून कोणत्याही राजकीय नेत्याला हा सन्मान देण्यात आलेला नाही. तसेच एका विरोधी पक्षाच्या नेत्याला सर्वोच सन्मान देण्यात आल्याने भाजपासह अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयावर बोलताना नितीश कुमार यांनी मोदी सरकारचे कौतुक केले. तसेच नाव न घेता लालू प्रसाद यादव यांच्या घराणेशाहीच्या राजकारणावर देखील त्यांनी जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले कर्पुरी ठाकूर यांनी आपल्या कुटुंबाला राजकारणात कधीच पुढे नेले नाही. मात्र असे अनेक दुर्दैवी लोक आहेत जे आपल्या कुटुंबाला राजकारणात पुढे घेऊन जात आहेत.