अभिनेत्री परिणीती चोप्राने लग्नानंतर मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत परिणीतीने सोशल मीडियावर सांगितले आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसेच सोशल मीडियावरही परिणीती चांगलीच चर्चेत आली आहे.
परिणीती चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ही पोस्ट शेअर करत परिणीतीने सांगितले की, ती आता तिच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू करणार आहे.
परिणीती चोप्राने काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, “मी आता संगीताच्या दुनियेत प्रवेश करणार आहे. संगीत हे माझ्यासाठी नेहमीच आनंदाचे ठिकाण राहिले आहे. मी अनेक वर्षांपासून संगीतकारांना रंगमंचावर सादरीकरण करताना पाहिले आहे. आता मी देखील या जगाचा एक भाग होणार आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की माझ्या आयुष्यातील आणखी एक नवीन अध्याय सुरू करण्यासाठी मी खूप उत्साहित आहे.
परिणीतीच्या या पोस्टला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. तसेच तिच्या या पोस्टवर तिचे चाहते आणि सेलिब्रिटी कमेंट करत आहेत आणि तिच्या नवीन प्रवासासाठी तिला शुभेच्छा देत आहेत.