आज आपल्या देशाचा ७५ वा प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात आनंदाचे, जल्लोषाचे आणि उत्साहाचे वातारण पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीमध्ये कर्तव्यपथावर भारतीय सैन्यदले आपल्या शक्तीचे प्रदर्शन करणार आहेत. यातून शत्रू देशांना एक संदेश देखील मिळणार आहे. तसेच यंदाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन असणार आहेत. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त १,१३२ जवानांना शौर्य आणि सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. कर्तव्यपथावर सैन्य दलांच्या ताकदीसह देशाचे सांस्कृतिक विविधता देखील पाहायला मिळणार आहे. यंदाच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ देखील असणार आहे.
प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने दिवसेंदिवस सशक्त होत जाणारी भारताची सैन्य शक्ती पाहायला मिळेल. सुरुवातीला वायू दलातील विमाने, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर अनेक कसरती दाखवून आजच्या परेडला सुरुवात करतील. या परेडमध्ये भारताकडे असणाऱ्या आधुनिक शस्त्रास्त्रांसह विविध राज्यांचे चित्ररथ पाहायला मिळतील. तसेच यंदाच्या परेडमध्ये महिलांची तुकडी देखील आपल्याला संचालन करताना दिसणार आहे. दरम्यान, ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीमध्ये जमिनीपासून आकाशापर्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तब्बल १४ हजार जावं सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. तसेच राजधानी दिल्लीच्या सीमा देखील सील करण्यात आल्या आहेत.