गेले काही दिवस राज्यातील काही भागांमध्ये थंडीचा चांगलाच कडाका वाढला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये अजूनही गार हवा आहे. देशाच्या उत्तर भागांमध्ये अजूनही थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे देशातील उत्तर भागामध्ये पुढील काही दिवस अत्यंत दाट धुक्याची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. देशासह राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान थंड राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये दाट धुके आणि थंडीचा इशारा देखील IMD म्हणजेच भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांमध्ये देशातील काही राज्यांमध्ये रात्री आणि सकाळी दाट धुके आणि कडाक्याची थंडी राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये देखील काही भागांमध्ये थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, कोकणात या भागात हवामानात घट होण्याची शक्यता आहे. तसेच उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे दिल्लीमध्ये देखील थंडीचा कडाका वाढला आहे. शहरामध्ये सकाळच्या वेळेस कमी दृश्यमानता असल्याचे जाणवत आहे. दाट धुक्याची चादर शहरामध्ये पाहायला मिळत आहे. यामुळे रेल्वे, विमाने आणि रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.