बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता आहे. कारण गेले दोन ते तीन दिवसांपासून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार पुन्हा एकदा एनडीए मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तसेच ते भाजपासोबत जाऊन पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात असे म्हटले जात आहे. असे घडल्यास ‘इंडिया’ आघाडीला आणि लालू प्रसाद यादव यांना एक मोठा धक्का मानला जाऊ शकतो. या सर्व घडामोडींवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
बिहारच्या राजकीय घडामोडींबद्दल भाष्य करताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, ”बिहारच्या राजकीय संकटात काँग्रेस पक्ष भारतातील गटातील मतभेद दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, “जनता दल ‘इंडिया’ आघाडी सोडणार आहे की नाही या बाबतीत मला कोणतीही माहिती नाही.”
दरम्यान, काही सूत्रांनी इंडिया टुडे टीव्हीला माहिती दिली की, JDU हे प्रमुख आणि बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत आणि अनेक काँग्रेस आमदार त्यांच्यासोबत जाणार आहेत. यासर्व बाबतीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असे खर्गे म्हणाले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, ”मात्र नितीश कुमार यांच्या मनात काय आहे ते मला माहिती नाही. मी दिल्लीला जाऊन पूर्ण माहिती घेईन. तसेच काँग्रेस पक्ष ‘इंडिया’ आघाडी मध्ये ”सर्वांना एकत्रित ठेवण्यासाठी” सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सीपीआय(एम) सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्याशी बोलणे झाले आहे.”
खर्गे पुढे म्हणाले, ”मी (ममता बॅनर्जी आणि सीताराम येचुरी) यांना सांगितले, आपल्याला एकत्रित राहण्याची गरज आहे. तरच आपण (आगामी लोकसभा निवडणुकीत) चांगली लढत देऊ शकतो. ”