बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजभवन येथे राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. नितीश कुमार यांना भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला आहे. तसेच नितीश कुमार आज संध्याकाळी 5 वाजता बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात असे म्हटले जात आहे. सोबतच भाजप अध्यक्ष जेपी नड्डा शपथविधीला उपस्थित राहू शकतात अशी माहितीही समोर आली आहे.
नितीश कुमार यांना आता भाजपने पाठिंबा दिला आहे, त्यामुळे बिहारमध्ये जेडीयू आणि भाजप सरकार स्थापन होणार आहे. तसेच एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या बैठकीत जेडीयूसोबत सरकार स्थापन करत असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये सम्राट चौधरी यांची विधानसभा नेते पदी आणि विजय सिन्हा यांची उपनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार बिहारमध्ये नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तर सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी दिली जाणार आहे. तसेच आज संध्याकाळी 7 वाजता शपथविधी कार्यक्रम होणार असल्याची माहिती समोर आली आहे.