लवकरच देशभरात १० आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. त्यानिमिताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ करत आहेत. बोर्डाच्या परीक्षा कसलीही काळजी न घेता देता याव्यात यासाठी पंतप्रधान मोदी गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांशी संवाद साधत आले आहेत.