बिहारमधील जनता दल आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) यांची युती तुटणे हे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) षडयंत्र असल्याचे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. तसेच भाजपने जनतेचा अपमान केला असून याचे उत्तर जनता लोकसभा निवडणुकीत देईल, असेही अखिलेश यादव म्हणाले.
अखिलेश यादव यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी म्हटले आहे की, भाजपने बिहारच्या जनतेचा आणि जनमताचाही अपमान केला आहे. या अपमानाला जनता लोकसभा निवडणुकीत भाजप आघाडीचा पराभव करून प्रत्युत्तर देईल. बिहारचा प्रत्येक रहिवासी बिहारची इज्जत वाचवण्यासाठी आणि भाजपला पराभूत करण्यासाठी पुढील मतदान करेल.
एकिकडे अखिलेश यादव यांनी भाजपवर टीका केली असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बिहारचे मु्ख्यमंत्री नितीश कुमार यांचे अभिनंदन केले आहे. योगी आदित्यनाथ यांनी X वर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी म्हटले आहे की, “श्री नितीश कुमारजी यांचे बिहार राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि श्री सम्राट चौधरी जी आणि श्री विजय सिन्हाजी यांचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली बिहारमध्ये स्थापन झालेले दुहेरी इंजिन सरकार राज्यात सेवा, सुशासन आणि विकासाचे उत्कृष्ट दर्जा प्रस्थापित करेल, असा पूर्ण विश्वास आहे.