यांचे त्यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर घेतलेली शपथ पूर्ण केली आहे. राज्य सरकारने अध्यादेश काढत जरांगे पाटलांच्या आरक्षणाबाबतच्या मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र आता या निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये आपल्या आरक्षणाला धक्का लागला आहे अशी एक भीती निर्माण झाली आहे. छगन भुजबळ हे वारंवार आपली भूमिका या विषयामध्ये मांडत आहेत आणि सगळं ओबीसी समजा माझ्या बरोबर आहे असे त्यांचे म्हणणे आहे. या सर्व घडामोडींवर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी ते म्हणाले, ”आमचे सरकार कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसी समाजाचे संरक्षण आपल्याला करावे लागणार आहे हे मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. मी अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, जोपर्यंत भारतीय जनता पार्टी तोपर्यंत काहीही झाले तरी आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. उद्या जर का अशी वेळ आली की आम्हाला ओबीसी समाजाला संरक्षण देता येत नाही तर , मी स्वतः जाऊन माझ्या वरिष्ठांशी बोलेन. मात्र काहीही झाले तरी ओबीसींवर अन्याय होणार नाही. हीच भाजपाची भूमिका आहे. छगन भुजबळांशी मी स्वतः चर्चा करणार आहे. त्यांना असलेले आक्षेप त्यांनी निश्चित सांगावेत. ओबीसींवर अन्याय होत असेल तर त्यात निश्चित परिवर्तन करू, आवश्यक सुधारणा करू. आता जो काही घेतलेला निर्णय आहे तो कोणताही सरसकट घेतलेला निर्णय नाही. ज्यांच्या नोंदी आहेत, त्यांना सहजतेने प्रमाणपत्र कसे मिळेल, एवढाच हा निर्णय आहे. यामुळे जे काही विषय माध्यमांमध्ये येत आहेत. यावर दोन्ही समाजाच्या बाजूने प्रतिक्रिया येणे हे अतिशय अयोग्य ठरेल. सरकारची भूमिका संतुलित आहे. सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. मराठा आरक्षणासंदर्भात आम्ही प्रक्रिया सुरु केली आहे. या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोग काम करत आहे. यामुळे सर्वानीच संयम बाळगला पाहिजे.”
दरम्यान, ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेला समर्थ नसल्याचे सांगितले आहे. मात्र छगन भुजबळ हे या विषयावर चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता सरकार कशाप्रकारे हा मुद्दा हाताळते हे देखील पाहणे महत्वाचे ठरेल.